Thursday 29 October 2015

     मानसं ही झाडाच्या अवयवा सारखीच असतात, काही फांदी सारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी ,काही काटयांसारखी सोबत असून टोचत राहणारी,आणि काही मुळासारखी असतात , जी  न दिसता सुरुवातीपासून शेवट पर्यंत साथ देणारी   -----!!!!!!!!!

Saturday 17 October 2015

एक संधी निसटली असं वाटतं तेव्हा दुसरी संधी आपली वाटपहात उभी असते फक्त  तीला शोधण्याकरता दृष्टी सजग हवी आपला  विश्वास हवा परमेश्वरावर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वता:वर !!!!!

Friday 16 October 2015

 गरज संपली की विचारांना डावलणारी मानसं, ही  फक्त स्वार्थासाठी जवळ येतात ......... परंतु विचारांनी विचारांशी  बांधलेली माणसं, निस्वार्थीपणे संकटात सुद्धा जवळ येतात........  आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही...... त्याचा गंध आपोआप सर्वदूर पसरत जातो.............!!!!!

Thursday 15 October 2015

 यश खूप दूर आहे असं आपल्याला जेव्हा वाटते---- तेव्हा ते खूप जवळही असू शकते . जेव्हा तू प्रतिकूल परीस्थितिशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न  करणे मात्र  सोडू नकोस------प्रयात्नानीच  तूला थकवा  येईल  तेव्हा थोडा विसावा घे ,पण माघार हेऊ नकोस अजिबात   ----येणाऱ्या सर्व आव्हानासाठी सज्ज रहा , त्यांना खंभीर मनाने सामोरे जा
 ऐरण झालास तर घाव  सोस -------
हातोडा झालास तर घाव घाल--------- !!!!!!!!!   DR.A.P.J.ABDUL KALAM


Tuesday 13 October 2015

स्वतःच्या कर्तृत्वावर ज्याचा विश्वास नाही, अशा माणसाला आपल्या चारी बाजूला शत्रूच दिसायला लागतात !!!!!!!!!!!!

Monday 12 October 2015

 धाडस, समयसूचकता आणि  निश्चित ध्यास या  गुणांची पारख निर्णय घेताना होत असते त्यासाठी योग्य निर्णय घेण्याची कला साधता आली पाहिजे 

Saturday 10 October 2015

 "  यशस्वी  कथा कधी वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो,अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात . "    डॉ.  KALAM




Friday 9 October 2015

गती आणि प्रगती या मध्ये  एक आगळाच भेद आहे , कारण लगाम सुटलेला घोडा वेगाने धावतो, त्याला गती असते,पण प्रगती नसते ........ म्हणून नुसती गती घेण्यापेक्षा योग्य दिशेने जा नक्कीच प्रगती होईल...!!!!!!!!!!!!

Thursday 8 October 2015

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते... परंतु आपल्या कोण यायला पाहिजे ते मन ठरवते.... पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला " स्वभावच "  ठरवतो !!!!!!



Wednesday 7 October 2015

एखादा सामान्य माणूसही जेव्हा उच्च ध्येय नजरेसमोर ठेवून समाजात वावरू लागतो.... तेंव्हा धाडसी पणा आणि  साहसीपणा त्याच्यात आपोआप  निर्माण होतो......माणसाचे यश हे त्याच्या प्रयत्नांना ..........आणि अपयश हे त्यांच्या  आळसाला चिकटलेले असते........!!!!!!!!

Tuesday 6 October 2015

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात. कारण शरीराला कुठे जखम झाली तर रक्त बाहेर येत, पण आसवांना बाहेर पाडण्यासाठी मनाला जखमी व्हावं लागत , म्हणून एखाद्याच्या मनाला जखम होईल असे कदापि
 वागू नका

Monday 5 October 2015

कपाळावरील रेषेत भाग्य  शोदान्या पेक्षा,कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याचीतुमच्यावर कधीच वेळ येणार नाही, म्हणून नशिब्वादी होण्यापेक्षा ,प्रयत्नवादी  व्हा !! यश तुमची वाट पहात आहे.!!!!

Sunday 4 October 2015

  1. अंधार आहे म्हणून रडत बसू नका, आणि उजेड पडण्याची प्रतीक्षा करू नका, अंधारा सारख्या संकटाला दोष देत बसण्या ऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल. ती ज्योत पेटवण्याचे मात्र धाडस दाखवा,धाडस दाखवा,

  2. आपण आयुष्यात कोण बनायचं हे आपणच ठरवायचं आहे इतिहास आपल्याला दिशा दाखवत असतो, भविष्य आपल्याला खुणावत असत, मग उरल काय ? तर वर्तमान !! तो तर आपल्याच मुठीत बंद असतो . मग त्याचा पुरेपूर उपयोग नको का करून घ्यायला




  3. देवाने तुमच्याकडून एखादी गोष्ट हिरावून घेतली असेल तर त्याचाबद्दल नाराज होऊ नका. लक्षात ठेवा की देवाने तुमचे हात रिकामे ठेवलेले असतात ,तुम्ही इतरांना अधिक काही चांगले देण्यासाठी !!!!

  4. गौतम बूध्द जी को किसिने एक बार पुछा "आप ,इतने महान होकर ,नीचे क्यों बैठते हो? बुध्द जी ने कहा " नीचे बैठने वाले को कभी भी गिरने का डर नही होता"इसिलिए दोस्तो ,हम कहि भी रहो लेकिन अपने विचारों से अपना स्थान निश्चित होता है !!!!!


  5. तुम्ही स्वतः वर विश्वास ठेवा ,म्हणजे दुसऱ्या वरही विश्वास ठेवा ,असे तुम्हाला सांगावे लागणार नाही !!!

  6. विजेता कधीच पळून जात नाही आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत ,काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका ,त्यासाठी संर्घष करा आणि त्या गोष्टी घडवून आणा !!! जीवनात नेहमी लढत रहा ,रडत नको

  7. अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो . राग सोडलेल्याला दुःख होत नाही. अभिलाषा सोडलेला माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडलेला खरा सुखी होतो.

  8. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, दुस-रयाच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश बनतो , जिंकलेल्या क्षणी हरलेल्या प्रतिस्पर्ध्यांना कमी
    लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती, यावरून माणसाची श्रीमंती कळते....तुमच्या पाठीशी किती जन आहेत हे मोजण्यापेक्षा
    तुम्ही किती जनाच्या पाठीशी आहात याला अधिक मह्त्व आहे !!!!!!!!!!!!!